पुणे | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रात, सहा ते आठ तारखेला कोकण गोवा व मराठवाड्यात आणि सात व आठ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशात हिमालयाच्या पायथ्याचा काही भाग आणि ईशान्य भारत वगळता राजस्थान, दिल्ली तसेच पूर्ण दक्षिण भारतात तापमान वाढले आहे. येथील कमाल तापमान हे सरासरी ३८ ते ४० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. हे तापमान पुढील चार-पाच दिवस वाढत राहणार आहे. राज्यात प्रामुख्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात कमाल तापमान वाढ झाली असून हे तापमान ३८ ते ४० अंशाच्या दरम्यान राहील.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात वाढ होऊन दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने तापमानात वाढ होणार आहे. अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. विदर्भात ब्रह्मपुरी येथे मंगळवारी सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीड व संपूर्ण विदर्भात पारा ४० अंशांवर पोहचला होता.
पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहून दुपारनंतर ढगाळ राहणार आहे. तर सात आणि आठ तारखेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
