Headlines
Home » महाराष्ट्र » गांधी मैदानात १०,४९५ विद्यार्थ्यांचा मानवी रांगोळी साकारून मतदारांना संदेश; नॅशनल व आशिया पॅसिफिक रेकॉर्डची नोंद

गांधी मैदानात १०,४९५ विद्यार्थ्यांचा मानवी रांगोळी साकारून मतदारांना संदेश; नॅशनल व आशिया पॅसिफिक रेकॉर्डची नोंद

कोल्हापूर | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने आज विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी (साखळी) साकारण्यात आली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले होते.

लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानामधील स्वीप अंतर्गत कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर १० हजार ४९५ विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला.

यावेळी शहरातील ३८ हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवून जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदविण्यात मोलाची भर घातली. ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचा “नॅशनल रेकॉर्ड” व “एशिया पॅसिफीक रेकॉर्ड” ची नोंद झाली.

दरम्यान आपली जबाबदारी व अधिकार, मजबूत लोकशाहीचा आधार… मतदारांनो लोकशाहीचा या महाउत्सवात अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन मतदान करा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!