Home » महाराष्ट्र » माझ्या कंपनीवर ईडी ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?

माझ्या कंपनीवर ईडी ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?

मुंबई | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज मात्र ईडीने पवारांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

ईडीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून याबाबत भाष्य केले आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही त्यावर एक्स अकाऊंटवर पलटवार केला आहे. “माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. पण मी महादेवाचा भक्त आहे, अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर #लडेंगे_जितेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे.

पत्रकारांसाठी आमदार रोहित पवार यांनी दुसरे एक ट्वीट केले आहे. त्या ते म्हणतात की, माझ्या कंपनीवर कारवाई केल्याबाबत ED ने केलेल्या केवळ Tweet व प्रेसनोटवरून एकतर्फी बातम्या करण्याऐवजी या विषयावर मी उद्या (शनिवार) सकाळी १० वाजता आपणास माझं सविस्तर निवेदन देत आहे. त्यामुळं सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी माझ्या निवेदनासह बातम्या प्रसिद्ध कराव्यात, ही विनंती. आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी बाहेर असल्याने सोमवार दि.११ रोजी या विषयावर पुण्यात मिडियासोबत सविस्तर संवाद साधणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!