पाचोरा | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शहरासह मतदारसंघातील विविध शिव मंदिरांमध्ये जाऊन आशीर्वाद घेतले.


आज सर्वत्र महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहासह भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी यांनी आज ठिककिाणच्या शिव मंदिरांमध्ये जाऊन माथा टेकवत तसेच प्रत्येक ठिकाणी पूजन करून त्यांनी आशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्या हस्ते भाविकांना फराळाचे वाटप देखील करण्यात आले.याप्रसंगी शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
