Headlines
Home » महाराष्ट्र » नागपूर येथीलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

नागपूर येथीलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

नागपुर | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नागपूर शहरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं झाल्याने शहरात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे, यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिति पसरली आहे. या केंद्रातील मृत कोंबड्यांचे नमुने पुणे आणि त्यानंतर भोपाळ येथे पाठवणयात आले होते. या दोन्ही ठिकाणचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची ( एव्हियन इन्फ्ल्युएन्झा ) लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

या अहवालाच्या आधारे जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला असुन खबरदारी घेण्यात येत आहे. या केंद्राच्या दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील २१ दिवसांपर्यंत प्रतिबंधही लागू करण्यात आले आहेत.

पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरु : जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार आणि केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार जिल्हात शिघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली. येथील एकूण ८ हजार ५०१ पक्षी आणि १६ हजार ७७४ अंडी तसेच ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आलं आहे.

घाबरु नका जागरुक राहा : बर्ड फ्लू रोग प्रादुर्भावाच्या अनुषंगानं जिल्हातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यात इतर कोठेही बर्ड फ्लूचा प्रभाव दिसुन आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक यांनी घाबरुन न जाता काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नागपूर यांनी केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!