Home » महाराष्ट्र » पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुणे | दि.०६ (वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गाचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून होणार आहे. मेट्रोचा हा मार्ग साडेपाच किलोमीटरचा आहे. या मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी अशी चार स्थानकं आहेत.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता हा मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोलकाता येथून या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते होणार आहे.

रुबी हॉल ते रामवाडी या पट्ट्याचे उद्घाटन झाल्यानंतर लाखो नगर रोड कार्यालयात जाणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा मेट्रो अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून येरवडा, कोरेगाव पार्क परिसर, कल्याणीनगर, विमान नगर यासह नगर रोडवरून प्रवास करणे हे प्रवाशांसाठी विशेषतः रात्री आणखीनच बिकट झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!