Home » महाराष्ट्र » डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राध्यापक भरतीस मुदतवाढ​

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राध्यापक भरतीस मुदतवाढ​

छत्रपती संभाजीनगर | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया आता गतीने पुढे सरकत आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे उद्भवलेल्या तांत्रिक बदलांनंतर, विद्यापीठ प्रशासनाने विविध अध्यापकीय आणि प्रशासकीय पदांसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवली असून दि.२० मार्च २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

दरम्यान राज्य शासनाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘ARC’ (अकॅडमिक आणि रिसर्च क्रेडेन्शियल्स) संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या बदललेल्या नियमांमुळे अर्जांमधील माहिती अद्ययावत करणे आवश्यक झाले होते. ही बाब लक्षात घेऊन कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उमेदवारांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

महत्वाच्या तारखा आणि तपशील:

• ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत: २० मार्च २०२६ (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत).
• ​हार्ड कॉपी जमा करण्याची मुदत: २५ मार्च २०२६.
• ​एकूण पदे: ७८ (सहाय्यक प्राध्यापक- ५२, सहयोगी प्राध्यापक- १२, प्राध्यापक- ०८, अधिष्ठाता- ०४ आणि संचालक- ०२).

​उमेदवारांसाठी सूचना:

​ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, अशा सर्व उमेदवारांनाही नवीन नियमांनुसार आपली माहिती अपडेट करावी लागणार आहे. नवीन अर्जदार ‘समर्थ’ (e-Samarth) पोर्टलवरून प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अधिकृत माहितीसाठी विद्यापीठाच्या www.bamu.ac.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!