Headlines
Home » जळगाव » मुळजी जेठा महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

मुळजी जेठा महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

जळगाव l वास्तव पोस्ट : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुळजी जेठा महाविद्यालय अभ्यासकेंद्रात आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या थोर नेतृत्वाच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला. चव्हाण साहेबांचे राजकीय, सामाजिक आणि विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य आजही तितकेच प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांची प्रस्तुतता आजच्या काळातही महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

​याप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसुर, केंद्र संयोजक डॉ. जुगलकिशोर दुबे यांच्यासह केंद्रातील ज्येष्ठ प्राध्यापक, समंत्रक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!