Headlines
Home » महाराष्ट्र » उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नववर्षाच्या पूर्वसंधेला राज्यातील नागरिकांना संदेश

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नववर्षाच्या पूर्वसंधेला राज्यातील नागरिकांना संदेश

मुबंई ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नववर्षाच्या पूर्वसंधेला नागरिकांना समाजमाध्यमातून संदेश दिला आहे. ते आपल्या एक्स ( पूर्वीचे ट्विटर ) या हॅण्डलवर म्हणतात की… तमाम बंधू – भगिनींनो, गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२५ हे वर्ष आता सरत आलंय, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवणारे २०२६ साल आपल्याला खुणावत आहे. आपण सर्वजण नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा, नवे संकल्प, नवी दिशा उरात बाळगून नव्या जोमाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहोत.

परंतु, नववर्षाचे स्वागत करताना आपल्या उत्साहाचा, कृतीचा, आचाराचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे इतर कोणालाही त्रास होणार नाही याची एक सुज्ञ व सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस तसेच इतर सरकारी यंत्रणा त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे बजावतील यात मला तीळमात्र शंका नाही. आपण सर्वांनीही त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

चला तर मग, आपण सर्वजण मिळून सरणाऱ्या २०२५ सालास निरोप देत येणाऱ्या २०२६ या नववर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करूया…
अशा प्रकारे उपमुख्यमंत्री यांनी संदेश दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!