Headlines
Home » जळगाव » राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता पवार हिला सुवर्णपदक

राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता पवार हिला सुवर्णपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, बँगलोर येथे सुरू असलेल्या ४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर क्युरोगी आणि १५ वी पुमसे स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी ची खेळाडू निकिता दिलीप पवार हिने ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तिने पहिल्या फेरीत कर्नाटकच्या मोनिषा एस., दुसऱ्या फेरीत केरळची अवंतिका व्हि. तिसऱ्या फेरीत मध्य प्रदेश ची अस्मी भारती हिचा पराभव करून अंतिम फेरीत मध्ये आसाम ची खेळाडू व्हिएना हजारिका हिला नमवत सुवर्णपदकावर आपले नांव कोरले.

निकिता पवार जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची खेळाडू असुन गेले ४ वर्षांपासून नियमित सराव करत असुन तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुद्धा तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून जम्मू काश्मीर येथे होणार असलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या यशाबद्दल जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी अभीनंदन करत शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!