Headlines
Home » राष्ट्रीय » राज्यसभेसाठी महाराष्ट्रात काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी

नवी दिल्ली, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काँग्रेसकडून राज्यसभा २०२४ साठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातुन चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी मिळाली आहे.

काँग्रेसची चंद्रकांत हंडोरे यांनाच पसंती का ?
चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे माजी महापौर आणि राज्याचे माजी मंत्री आहेत. काँग्रेसमधील एक प्रमुख दलित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. ते भीम शक्ती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. हंडोरे यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं मुंबईतील दलित मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. हंडोरे हे खासदार झाल्यास आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो असाही पक्षाला विश्वास आहे .

दरम्यान, चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता. याच मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. काँग्रेसनं आज राज्यसभेसाठी चार उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात खुद्द पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांचा समावेश आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून अर्ज दाखल करणार आहेत. त्याशिवाय, अखिलेश प्रसाद सिंह यांना बिहारमधून आणि अभिषेक मनु सिंघवी यांना हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. तर, चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!