Headlines
Home » जळगाव » के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत अध्ययन आणि अध्यापन कार्यशाळा

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत अध्ययन आणि अध्यापन कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विद्यार्थी वर्गात येण्यासाठी प्रेरित होऊन त्याने अभ्यास केला पाहिजे तसेच तो स्वविकासाचा कर्ता झाला पाहिजे, यासाठी शिक्षकाने टीचिंग व लर्निंगचे काही कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी अध्ययन आणि अध्यापन ही पंचसूत्री समजून घेतली पाहिजे असे केसीई संस्थेच्या शैक्षणिक संचालिका माजी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट जळगाव येथे प्राध्यापकांना अध्ययन आणि अध्यापन मध्ये प्रेरित होण्यासाठी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले.

यावेळी करियर कट्टा समन्वयक डॉ. शमा सराफ, प्राचार्य डॉ. संजय सुगंधी उपस्थित होते. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐर्नजाइजर द्वारे प्राध्यापकांच्या नावावरून व विशेषणाचा वापर करून त्यांचे गुण सांगितले. प्रत्येक प्राध्यापकाला चॉकलेट देऊन त्या रॅपरचा नाविन्यपूर्ण वापर करणे, ‘शैक्षणिक स्थिती’ या विषयावर उतारा देऊन सर्वांसमोर विश्लेषण करण्यास सांगितले. त्यातून केस स्टडी चा कसा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ब्रेन स्टोर्मिंगचा उपयोग अध्ययन आणि अध्यापनात करण्यास सांगितले. डॉ. मृणालिनी फडणवीस या सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुतिका घरडे (एच आर विभाग प्रमुख) तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहा पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!