Home » जळगाव » के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखती संपन्न

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखती संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात टेक महेंद्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे विद्यमाने मुलाखती घेण्यात आल्या.

जिल्ह्यातून विविध शाखेच्या १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यात २० विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांचे कौशल्य, सवांद, वाचन, लेखन, तांत्रिक माहिती या घटकांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी निवड झालेल्या विदयार्थ्यांचे कौतुक केले. प्रा. हेमंत धनधरे, प्रा. देवेंद्र पाटील, प्रा.गणेश पाटील, प्रा. श्रुतिका घरडे, यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!