Home » राष्ट्रीय » केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा रद्द

दिल्ली , दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु १५ तारखेला होणारा हा महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५ लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार होता. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते.

उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शाहा हे देखील छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर भागातील मराठवाडा संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा पार पडणार होती. विशेष म्हणजे याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या सभा गाजल्या होत्या. आता त्याच मैदानावर अमित शाहा यांची सभा घेणार होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!