Headlines
Home » जळगाव » ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिवस साजरा

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. याप्रसंगी एन.सी.सी.च्या विद्यार्थिनी सुद्धा कार्यक्रमात सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे वर्षभर संवर्धन करणार अशी प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, डी.बी. चौधरी, वेद प्रकाश गडदे, निर्मल चतुर, दिपाली खडके, नूतन वराडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रेम कुमार पाटील, भावेश वंजारी, भावेश पाटील, चिन्मय पाटील प्रतीक हिवरे, वेदांत थोरात, श्रुती पाटील, या विद्यार्थ्यांनी घरून रोप आणून ते शाळेत लावले. तसेच विद्यार्थ्यांनी घरी ‘एक पेड माॅं के नाम‘ या मोहिमेअंतर्गत आईसोबत एक झाड लावण्याची प्रतिज्ञा घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!