Headlines
Home » जळगाव » रेडियो मनभावन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

रेडियो मनभावन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम. च्या माध्यमातून जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून आपल्या मखमली आवाजाने श्रोत्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणाऱ्या जादुई आवाजाच्या प्रिया सफळे, कांचन पाटील, जयश्री भोसले, निलम पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, रेडियो मनभावनचे संचालक अमोल देशमुख, जनसंपर्क अधिकारी संदीप केदार, आर जे शुभांगी बडगुजर उपस्थित होते. सामुदायिक रेडीओ जनसामान्यांच्या गरीब असो वा श्रीमंत त्यांचे दु:ख, वेदना आणि त्यांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सोडवत आहे.

मूळजी जेठा महाविद्यालयाचे विद्यार्थी इंटर्नशिप करत करत रेडीओ चा आवाज बनत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे असे मनोगत प्राचार्य संजय भारंबे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी इंटर्न हर्षल सुरडकर, नेहा मराठे, गौरव सोनवणे, ग्रीष्मा पाठक, साहिल गायकवाड, प्रतिक वाणी, अनिकेत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!