जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे अभ्यास जत्रेचे आयोजन करण्यात आले. सदर अभ्यास जत्रेचे उद्घाटन एम.जे. कॉलेज मराठी विभागाच्या प्रा. संध्या महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित माहिती, चित्र, प्रोजेक्ट, मॉडेल, तक्ते, चित्रफीत, कार्ड यांचा वापर करून स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची मांडणी ज्याप्रमाणे एखाद्या जत्रेमध्ये स्टॉल लावून केली जाते त्याप्रमाणे केली व आलेल्या शिक्षक, वर्गमित्र तसेच पालकांना ही माहिती सांगितली. सर्वांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका स्वाती पाटील, कायनात सय्यद, तसेच मीनाक्षी इसे यांनी केली. तर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
