जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील बुध्यांकाचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने मॅथेक्स गणित प्राविण्य या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेमध्ये जिल्हास्तरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात. ज्यामध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची दिशा गिरीश राणे ही इयत्ता आठवीची विद्यार्थीनी गणित प्राविण्य मॅथेक्स या परीक्षेमध्ये लेवल एक मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तिच्या या घवघवीत यशासाठी तिचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
तसेच श्रद्धा नितीन पाटील, शंतनू गोपाळ खडके, स्वराज गणेश वराडे, ईशांत विक्रांत महाजन, मोहनीश प्रफुल्ल पाटील, अथर्व अमोल पाटील, अनन्या मनोज चौधरी, गार्गी महेंद्र शिरुडे, चिन्मया प्रशांत बोंडे, तन्मय भिकन पाटील, सोहा अभय चौधरी,अर्णव प्रवीण भोळे हे विद्यार्थी देखील सेकंड लेव्हल मॅथेक्स गणित प्राविण्य परीक्षेच्या दुसऱ्या लेव्हल साठी पात्र ठरले आहेत.
सर्व विद्यर्थ्यांना स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची, शाळेतील गणित विषयातील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे .तर उपप्राचार्या मेघना राजकोटिया समन्वयक शशिकांत वडोदकर, संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या विद्यार्थ्यांना पुढील सेकंड लेव्हलच्या परीक्षेच्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
