Headlines
Home » सामाजिक » पिंप्राळा येथील प्रदिप पाटील यांना मा.उपमुख्यमंत्र्यांकडून प्रभु रामचंद्रांची मूर्ती व सन्मानपत्र प्राप्त.

पिंप्राळा येथील प्रदिप पाटील यांना मा.उपमुख्यमंत्र्यांकडून प्रभु रामचंद्रांची मूर्ती व सन्मानपत्र प्राप्त.

जळगाव, दि.१७ संदिप रंधे ( वास्तव पोस्ट न्यूज )
जळगाव शहरातील उपनगरातील प्रदिप पाटील हा युवक मागील दहा ते बारा वर्षा पासून पिंप्राळा नगरीत सेवा वस्तीत सामाजिक ,शैक्षणिक वैद्यकिय क्षेत्रात कार्य करीत आहे. अनुलोम सेवा वस्ती मित्राची जबाबदारी पार पाडून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे , या सर्व कार्याची थेट दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री .देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अयोध्या येथील प्रभु रामचंद्र यांची मूर्ती व सन्मान पत्र यांना प्राप्त झाले आहे यामुळे पिंप्राळा परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी श्री साई कॉलनी मित्र परिवारा तर्फे पिंप्राळा उप- नगरात कलश यात्रा काढण्यात आली होती.प्रभु श्री रामचंद्र यांच्या प्रतिष्ठेच्या आमंत्रण अयोध्या येथून आलेल्या अक्षदा वाटप करण्यात आले व यांना मिळालेली मूर्ती पालखीत ठेवून पिंप्राळा नगरीत वाजत गाजत मिरवणूक काढून दिनांक २२ तारखेच्या अयोध्या येथे होणाऱ्या प्रभु रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आमंत्रण परिसरातील नागरिकांना देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार मा.श्री राजूमामा भोळे, ह.भ.प.पृथ्वीराज पाटील.योगेश्वर जोशी, विजयसिंग पाटील( नगर सेवक )अतुल बारी( सामाजिक कार्यकर्ते) विश्व हिंदू परिषदेचे श्री.देवेंद्र भावसार ,तसेच अनुलोम चे जळगाव उपविभाग जनसेवक श्री. दत्ता नाईक अनुलोम चे पवन येपुरे जळगाव भाग जनसेवक तुषार सोनार सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच श्री साई कॉलनी मित्र मंडळाचे श्री. योगेश गोसावी श्री.मिलिंद वाघोदेकर ,श्री.अनिल पन्हाळे , श्री .भाऊसाहेब पाटील , दर्शन दादा, श्री. बंडू पाटील , श्री. विनोद मिस्तरी , सागर पाटील, श्री.प्रशांत पाटील, पद्माकर आखाडकर ,महेश वाणी, महेंद्र सोनार कुलदीप शेळके , राजू पाटील , दीपक डहाके व बजरंग दल चे कार्यकर्ते ,तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!