सेवा परोपकाराची भावना ठेवा : परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आत्मशुद्धतेसाठी लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य हे मार्ग महत्त्वाचे असून दुसऱ्यांविषयी सेवा परोपकाराची भावना ठेवली पाहिजे. एखाद्या कपड्यावर डाग पडले तर ते साफ करता येतात. मात्र चारित्र्यावर पडलेला डाग कितीही प्रयत्न केले तर साफ होत नाही. त्यामुळे सज्जन माणसाने डोळ्यात लज्जा व हृदयामध्ये दुसऱ्यांविषयी दया भाव ठेवावा. अहिंसा, विनय हे…
