Headlines

म.न.पा. जळगाव द्वारा आयोजित सॉफ्टबॉल स्पर्धेत ओरियन स्टेट बोर्ड स्कूल विजयी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : म.न.पा. जळगाव द्वारा आयोजित सॉफ्टबॉल स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम जळगाव येथे घेण्यात आल्या. यात ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रथम स्थान पटकावत विभाग स्तरावरील स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला. आणि विभाग स्तरावरील सामन्यातही तृतीय स्थान मिळवत कांस्य पदक मिळविले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि शाळेचे प्राचार्य…

Read More

संविधानाचे जतन करणे हीच संविधानकर्त्यांना खरी आदरांजली : प्रा. अशोक राणे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त के. सी. ई. शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास प्राचार्य अशोक राणे, उपप्राचार्य केतन चौधरी, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक राणे होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार…

Read More

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेचे जिल्हास्तरीय मूल्यांकन ; एकाचवेळी ७८२ जिल्ह्यात सर्वेक्षण !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने एनसीईआरटी आणि सीबीएसईच्या सहकार्याने परख राष्ट्रीय सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवला गेला. दि.४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर ७८२ जिल्ह्यामध्ये ८७६१९ शाळांमध्ये २३ लाख विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या २३ भाषांमध्ये हे सर्वेक्षण एकाचवेळी पार पडले. परख म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेचे जिल्हास्तरीय केलेले मूल्यांकन….

Read More

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे…

Read More

रेडियो मनभावन पोहचविणार जेष्ठ नागरिकांपर्यंत “अटल वयो अभ्युदय योजना”

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार ) व सामुदायिक रेडिओ संघटना, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “आमचे जेष्ठ, आमचा अभिमान “ या अभियानंतर्गत अटल वयो अभ्युदय योजने बद्दल जिल्ह्याभरात जनजागृती करण्यासाठी सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम. च्या माध्यमातून पुढील ४ महीने राबविण्यात येणार असून अटल वयो अभ्युदय योजने…

Read More

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बहिणाबाई कान्हदेशच्या कवयित्री होत्या असे म्हणणे, म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरेल, त्या तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री होय, कारण त्यांनी भूगोलाच्या सीमारेषा कधीच ओलांडल्या आहेत. त्यांचे साहित्य तर साऱ्या विश्वाचे धन होय. आपण भाग्यवान आहोत की, त्यांच्या कविता आपल्यासाठी उपलब्ध आहे, असे सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त…

Read More

के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात म्युझिक क्लब स्थापन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात म्युझिक क्लब स्थापन करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर. सुगंधी यांचे हस्ते म्युझिक क्लबचे उद्घाटन करण्यात आले. क्लबची जबाबदारी प्रा. रेवती पाटील व देवेंद्र पाटील यांना सोपवण्यात आली. उद्घाटन प्रसंगी डॉ. सुगंधी सरांनी संगीताचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी आपल्या भाषणात…

Read More

आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२४ ; विजेत्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठस्तरीय आंतर महविद्यालयीन युवक महोत्सव २०२४ मध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळालेल्या विद्यार्थ्यांचा, तसेच एस.एस. मणियार विधि महाविद्यालय, आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पालकांसमवेत गुणगौरव सोहळा जुना कॉन्फरन्स सभागृहात करण्यात आला. तसेच पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरणाने दाद मिळवली. यावेळी केसीई सोसायटीचे अध्यक्ष…

Read More

बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी निमित्त ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत जुने जळगावातील रामपेठ, चौधरीवाडा, बहिणाई स्मृती संग्रहालय येथे उद्या दि. ३ डिसेंबर ला सकाळी १० वाजता ‘स्मरण बहिणाईचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे…

Read More

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोक जैन

युवा कवयित्री पलक झंवर हिच्या ‘पलकोसे खुली कल्पनाए’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी मान्यवर… जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘पलको से खुली कल्पनाए’ केवळ शब्दांची जुळणी नाही तर आयुष्यातील विविध भावनांचा खोलपणा दाखवणारा संग्रह आहे. युवा कवयित्रीने अल्पवयात जीवनाचे सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात, असे प्रतिपादन जैन उद्योग…

Read More

दरे गाव येथे एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य ; मी माझा निर्णय आधीच स्पस्ट केला आहे !

सातारा ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी साताऱ्यातील दरेगाव येथे गेल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज दरेगाव इथे पत्रकार परिषद घेऊन जनतेकडून मिळालेल्या कौलाबद्दल मोठा खुलासा केला. निवडणुकीच्या धावपळीमुळे…

Read More

भारतीय वंशाच्या काश पटेल यांची एफबीआय संचालक म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे गुजराती असलेल्या काश पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ट्रम्प यांनी काश पटेल यांची एफबीआय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. काश पटेल हे ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. पटेल २०१७ मध्ये गुप्तचर विषयक सभागृहाच्या संसदीय निवड समितीचे सदस्य…

Read More

महाराष्ट्राच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा आंतरराष्ट्रीय गौरव ; प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संकल्पनेतून राबविलेल्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” ची निवड करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने…

Read More

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि.३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय अभिजात संगीताचा व ‘खान्देशच्या रसिकांच्या सांस्कृतिक कक्षा रुंदावणारा महोत्सव’ म्हणून नावारूपास आलेल्या ‘बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि.३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार…

Read More

‘शिवशाही’ बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया ( वास्तव पोस्ट ) : विदर्भात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघाताने एसटी महामंडळ हादरले आहे. या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० जणं गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या भीषण अपघातात मृतांचा आकडा…

Read More
Top
error: Content is protected !!