विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा : मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विज्ञान प्रदर्शन हा केवळ स्पर्धा नाही, तर तो आपल्या प्रयोगशीलतेला नवे आयाम देणारा एक मंच आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेस चालना देण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रयोगशील विचारसरणी अंगी कारावी, जे जमते त्यावर अधिक भर द्यावा. विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास…