वैशालीताई सुर्यवंशी यांची अनोखी वटपौर्णिमा ;मतदारसंघात वटवृक्षांचे वाटप व रोपण करून पूजन
पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय संस्कृतीतील पती-पत्नीच्या नात्यातील विलोभनीय भावबंध असलेल्या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पर्यावरणपूरक अशा वृक्षारोपणाच्या चळवळीला गती देत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी नाविन्यपूर्ण पध्दतीत वटपौर्णिमा साजरी केली आहे. या संदर्भातील वृत्त असे की, ज्येष्ठ पौर्णिमा ही भारतीय संस्कृतीत वटसावित्री पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. या सणातील प्रमुख घटक म्हणजे वटवृक्ष…
