पुणे | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– येथील एका सराईत गुन्हेगाराने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे.
याबाबत सदाशिव पेठेत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तन्मय नामदेव लोहकरे, रा. खडकवासला पेट्रोल पंपासमोर, पुणे) या २२ वर्षीय युवकाविरुद्ध आयपीसी ३७६/२/एन, ५०६ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल आहे. आरोपी तन्मय लोहकरे याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असुन तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला घरी बोलावून तिच्यासोबत अनेकवेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वेळोवेळी दमदाटी करुन व लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केले. तसेच पीडितेकडून रोख ३५ हजार रुपये व ८१ ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. याप्रकरणी पीडित तरुणीने विश्रामबाग पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आहे असुन, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे करीत आहेत.
