जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट व होप फाउंडेशन यांच्यातर्फे छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांच्या श्रवणशक्तीची स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली. बालरोगतज्ज्ञ डॉ.अविनाश भोसले यांनी हॉस्पिटलमधील नवजात बालकांची व अतिदक्षता विभागातील बालकांची ओएई तपासणी केली.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर दहा हजार मुलांमागे पाच नवजात शिशु जन्मतः श्रवणदोषाने ग्रस्त आहेत. जन्माच्या पहिल्या २४ ते ४८ तासात नवजात बालकाची ओएई किंवा एबीआर स्क्रीनिंग तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंग, सचिव संजय तापडिया, डॉ. मूर्तजा अमरेलीवाला, मेडिकल कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मणियार, डॉ. शीतल भोसले, डॉ. गोविंद मंत्री आणि छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलचे प्रशासकीय प्रमुख संतोष नवगाळे व डॉ. राम रावलानी यांचे सहकार्य लाभले.
