मुंबई दि .३० ( प्रतिनिधी ) मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये चरित्र आणि विनोदी भूमिका करणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली .
सर्वात प्रथम दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना पांडू हवालदार या चित्रपटात अभिनेता म्हणून संधी दिली होती. त्यानंतर आलेल्या राम राम गंगाराम चित्रपटात, या चित्रपटातील अशोक सराफ यांची मुस्लिम खाटीकची भूमिका प्रचंड गाजली. तसेच “काटू क्या” हा त्यांचा संवादही चांगलाच गाजला होता. त्यानंतर अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत अनेक चित्रपटात विनोदी भूमिका साकारल्या. हळूहळू अशोक सराफ यांना हिंदी चित्रपटांत देखील भूमिका मिळायला सुरवात झाली.
अशोक सराफ यांनी जवळपास सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारल्यात. या विविध भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने कलाक्षेत्रात दिलेल्या अतुलनीय भरीव योगदानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकमताने यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची निवड केली.
