जळगाव
पिडीत, शोषित, वंचित महिलांच्या न्यायासाठी उभी राहिलेली अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल — भारती कुमावत
भारती ज्ञानेश्वर कुमावत (विधी तज्ञ कौन्सिलरतथा जेष्ठ समाजसेविका ) समाजाच्या तळागाळात आजही अनेक पिडीत, शोषित व वंचित महिला आपल्या वेदना मनातच दडवून जगत आहेत. अन्याय सहन करताना त्यांचा आवाज दडपला जातो, हक्क हिरावले जातात आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार केवळ कागदापुरते उरतात. अशा अंधारलेल्या आयुष्यात न्यायाची, हक्कांची आणि अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे नाव म्हणजे —…
आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग : मंत्री नारायन सिंह कुशवाह
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक…
मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना, एकमेकांना सहकार्य करणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सकाळी आठ वाजेपासून झाली. स्काऊट गाईड प्रार्थना, सर्व धर्म समभाव…
जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात
By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार…
“विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विश्वासू रखवालदार”
जळगाव कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा विभाग संचालक योगेश पाटील विद्यार्थ्यांचे आयुष्य एका निकालावर वळण घेत असते. त्या निकालामागे असते अनेकांचे श्रम, पण त्या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असतो — परीक्षा विभाग. आणि त्या विभागाचे नेतृत्व जर प्रामाणिक, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हाती असेल, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आपोआप विश्वासात बदलते. जळगाव येथील कवयित्री…
मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण व आनंद मेळावा संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा पारितोषिक वितरण व स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष कमल कुमार पारख, सदस्य सुभाष पाटील,…
अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी : प्रेम कोगटा
आकाशात फुगे सोडून उद्घाटन करताना डावीकडून रूपाली वाघ, रश्मी लाहोटी, निशा जैन, प्रेम कोगटा, अशोक जैन, अनिश शहा, मनोज दाडकर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून निर्माण केलेली शैक्षणिक जत्रा म्हणजे एड्युफेअर या उपक्रमातून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. यातून मुलांचे भविष्य घडविले जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायीक दृष्टीकोन दिसतो, असे कोगटा इंपोर्ट एक्सोपर्टचे…
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’
खेळ, शिक्षण आणि सर्जनशीलतेचा संगम, मनोरंजनातून मिळणार ज्ञानाचे दर्शन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एड्युफेअर–२०२५’ हा भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम दि. १९ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर सायंकाळी ४ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा…
विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेतीला नवी दिशा : अशोक जैन
जैन हिल्स येथे ‘कृषी महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी अशोक जैन, अजित जैन, शशिकांत पाटील व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “शेतकऱ्यांनी जैन हिल्स येथील उच्च कृषितंत्रज्ञान पाहून त्याचा वापर आपल्या शेतात करावा. जेणे करून फायदेशीर आणि शाश्वत शेती करता येईल. या तंत्रज्ञानाचा फायदा स्वतः घ्यावा आणि इतरांनाही माहिती द्यावी,” असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक…
जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५
लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची असणार उपस्थिती जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) चे आयोजन केले आहे. जैन हिल्स…
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांतर्फे श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त (जयंतीनिमित्त) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात सूत कताई प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती अशोक जैन यांनी चरखा चालवून या उपक्रमाला औपचारिक सुरुवात केली. आठ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणामुळे दिव्यांग केंद्रातील मुलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे. रुशील…
अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न
यशाचा मंत्र… शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची : मिनल करनवाल जळगाव (वास्तव पोस्ट ) : यशाची संकल्पना जास्तीत जास्त शालेय गुण मिळविणे हिच नाही तर त्यासोबत सकारात्मकता आणि जीवनमूल्ये देखील अत्यंत महत्त्वाची असतात. ती स्पर्धेच्या युगात मोलाची ठरतात. थॉमस एडिसन ने बल्बचा शोध लावला त्या आधी तो हजार वेळा अपयशी झाला होता, मात्र प्रयत्न करीत राहिल्याने…
महामार्गावरील उंचसखल रस्त्याची खरडपट्टी देत आहे लोकांच्या मृत्यूची घंटा…!
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडूजीचे काम सध्या बाराही महिने सुरु असते, याचे कारण म्हणजे कामाची असलेली गुणवत्ता होय. रस्त्याच्या कामात उपयोगी येणारे यांची विविध प्रकारची अवाढव्य वाहने ही रस्त्याच्या कामापेक्षा रस्त्याच्या दूतर्फा कुठेतरी उभी केलेली दिसून येतात. महामार्गावर रिंगरोड तसेच भास्कर मार्केटकडून बहिणाबाई उद्यान मार्गे अग्रवाल हॉस्पिटलकडे येतांना असलेल्या…
माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., एम.आय.डी.सी. जळगाव येथील एलपीजी रिफिलिंग प्लांटमध्ये नोंदणीकृत माथाडी कामगारांना प्रवेश व काम नाकारण्यात आल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीची व सखोल बैठक घेण्यात आली. उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटनेने माथाडी मंडळात नोंदणीकृत असलेल्या कामगारांना दि. ३ डिसेंबर २०२५ पासून कामावर येण्यास…
जळगाव शहरातील महामार्ग समांतर रस्त्यांअभावी अपघातात वाढ ; अग्रवाल हॉस्पिटलजवळील रस्त्याची दयनीय अवस्था
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या बांधकामात गेल्या काही वर्षांपासून जाणूनबुजून मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. या विलंबामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था प्रचंड कोलमडली असून, लहान मोठ्या अपघातांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. विशेषतः अग्रवाल हॉस्पिटल आणि एकलव्य क्रीडा संकुल ( एम.जे. कॉलेज कॅम्पस ) जवळील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय…
