क्रीडा
वानखेडेवर भारताचा थरारक विजय; टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक!
वास्तव पोस्ट l मुंबई : येथील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी थरारक विजय मिळवत फायनलमध्ये दमदार प्रवेश केला. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २५३ धावांचा भक्कम डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक…
दक्षिण आफ्रिकेचे ‘चोकर्स’चे ग्रहण सुटेना; फिन ॲलन च्या त्सुनामी खेळीने न्यूझीलंड फायनलमध्ये
वास्तव पोस्ट l कोलकाता : टी-२० विश्वचषक २०२६ च्या पहिल्या सेमी-फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरशः पालापाचोळा केला. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ९ गडी राखून विजय मिळवत फायनलचे तिकीट पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेले १७० धावांचे आव्हान न्यूझीलंडने अवघ्या १२.५ षटकांतच पूर्ण करून क्रिकेट विश्वाला थक्क केले. आफ्रिकेची अडखळती सुरुवात,…
संजू सॅमसनच्या वादळी ९७ धावा; वेस्ट इंडिजला हरवून भारत टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत!
वास्तव पोस्ट l कोलकाता : क्रिकेट विश्वातील सर्वांत रोमांचक स्पर्धा असलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने आज दि. १ मार्च रविवार रोजी एक ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सुपर एट्स ग्रुप १ च्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. हे चेस भारतासाठी विश्वचषकातील सर्वांत मोठे यशस्वी लक्ष्य ठरले,…
T20 विश्वचषक 2026: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश!
वास्तव पोस्ट | कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने आपला विजयी रथ कायम राखत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात विजय मिळवत भारताने ‘सुपर-८’ फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर अभिषेक…
भारताने अंडर-१९ क्रिकेट विश्वकप २०२६ जिंकला ; इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज शतकी खेळी, ८० चेंडूत १७५ धावा, १५ चौकार आणि १५ षटकार हरारे ( वास्तव पोस्ट ) : झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज झालेल्या आयसीसी अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वकपच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी दणदणीत पराभव करून विश्वकपचे विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले. कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि…
“जळगाव ओपन-२०२५” राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात ; राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग
उद्घाटनाप्रसंगी डावीकडून विनित जोशी, ब्रिजेश गौर, रफिक शेख, प्रिती अग्रवाल, सचिन गाडगीळ, किशोर जाखेटे, रविंद्र धर्माधिकारी, किशोर सिंह, निकिता वाधवानी, दिपीका ठाकूर, चेतना शहा आदी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंट चे उद्घाटन आज जिल्हा क्रीडा संघाच्या…
जिद्द आणि चिकाटीच्या बळावर, भारतीय लेकींनी कोरले क्रिकेट विश्वचषकावर नाव
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत व अभिनंदन करून संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने एकही सामना न हरता अपराजित राहून अंतिम सामना फक्त १२…
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक
निकिता पवार सोबत प्रशिक्षक जयेश बाविस्कर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार ने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक…
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीची निकिता दिलीप पवार हिला कांस्यपदक
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जम्मू काश्मीर येथे सुरू असलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती निकिता दिलीप पवार हिने १९ वर्ष आतील मुलींच्या ५५ किलो आतील वजन गटात कांस्यपदक पटकाविले, तिने पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशची तमन्ना प्रजापती, दुसऱ्या फेरीत कर्नाटकच्या संजना सामंथा…
महिला विश्वचषक क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत भारतीय महिला विश्वविजेत्या !
नवी मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. शेफालीने फलंदाजीत सर्वाधिक ८७ धावा तर केल्या तसेच संघाला गरज होती तेव्हा २ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे शेफाली वर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताला वर्ल्ड कपला गवसणी घालता आली. भारताने प्रथम फलंदाजी करत २९८ धावा कुटल्या. भारताच्या गोलंदाजांनी…
राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता पवार हिला सुवर्णपदक
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, बँगलोर येथे सुरू असलेल्या ४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर क्युरोगी आणि १५ वी पुमसे स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी ची खेळाडू निकिता दिलीप पवार हिने ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तिने पहिल्या…
महिला विश्वचषक २०२५ : ऑस्ट्रेलियावर विश्वविक्रमी विजय मिळवत भारत अंतिम फेरीत !
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत सर्वबाद ३३८ धावा करत भारतासमोर विजयासाठी विश्वचषक बाद फेरीतील आतापर्यंतचे…
तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून निकिता पवार महाराष्ट्र संघात !
रत्नागिरी ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरू असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची निकिता दिलीप पवार हिने मुलींच्या ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावुन बॅंगलोर येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात स्थान निश्चित केले, नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत…
अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल विजेता
सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या तामिळनाडू संघासोबत अतुल जैन, निशा जैन, प्राचार्य देबासीस दास जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत गुरुवारी अंतिम लढत पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये झाली. एकतर्फी झालेल्या या लढतीत पश्चिम बंगालच्या संघाने केरळवर ८२ धावांनी विजय मिळवत विजेतेपद…
सीआयएससीई क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी पश्चिम बंगाल आणि केरळ संघात अंतिम लढत
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केरळ आणि पश्चिम बंगालने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. केरळने महाराष्ट्राचा तर पश्चिम बंगालने तामिळनाडूच्या संघाचा पराभव केला. आता दोन्ही संघात विजेतेपदासाठी गुरुवारी लढत होणार आहे. उपात्यंफेरीच्या पहिला सामना पश्चिम बंगाल आणि…
