Headlines

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा

CM – EKNATH SHINDE : किनारी मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरु असुन हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे वाहतुकीच्या कोंडीतुन जनतेला दिलासा मिळणार आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान…

Read More

सापुतारा घाटात खाजगी बस कोसळून अपघात ; अपघाताची घटना व्हिडीओमध्ये कैद !

सापुतारा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील सापुतारा घाटात चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये ५७ प्रवाशी होते. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी युद्ध पातळीवर मदत केली आणि रुग्णवाहिकाही बोलावली. दरम्यान या अपघाताचा एक…

Read More

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत मोरेंचा जाहीर पक्षप्रवेश

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी वसंत मोरे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच इतर अनेक शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित…

Read More

मद्यपी वाहनचालक तसेच नियम भंग करणाऱ्या पब्ज, बारवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातील बऱ्याच प्रकरणात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ हे मुख्य कारण समोर येत आहे. यामुळेच आता मुंबईतील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या…

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर मुंबई ठाण्यासह काही जिल्ह्यातील शाळांना उद्या सूटी जाहीर

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले असुन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्या नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने सर्वांचीच त्रेधा उडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे. दरम्यान मुसळधार…

Read More

मुख्यमंत्री यांनी दिली नियंत्रण कक्षाला भेट ; हवामान खात्याकडून मुंबईस ऑरेंज अलर्ट !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शहराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्री यांनी मुंबईकरांना आवाहन केले. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

धावत्या लोकलमधुन महिला रुळावर पडली ; जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले !

नवी मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. ठिकठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मिळेल ती लोकल पकडून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना…

Read More

ऊर्जा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ; मुळ वेतन आणि भत्त्यांत मोठी वाढ

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. आदींमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, कर्मचारी…

Read More

मोबाईलवर रील बनविण्याच्या नादात एका तरुणाने गमावला आपला जीव !

धुळे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आजकाल सोशल मीडियावर रील्स आणि स्टंट्स बनवण्याची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. मात्र, ही क्रेझ अनेकदा त्यांच्यासाठी जीवघेणी ठरते. अशाच एका घटनेत दुचाकीवर धोकादायक स्टंट करताना एका तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवर दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात दुचाकीवर स्टंट…

Read More

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी ‘या’ मुलींना १०० टक्के शुल्क माफ !

BREAKING : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय ! व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या EWS, SEBC आणि OBC मुलींचे १०० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने नुकतीच मुलींच्या मोफत…

Read More

वंचितची साथ सोडत वसंत मोरे उद्धव सेनेच्या वाटेवर ; ९ जुलै रोजी होणार पक्षप्रवेश

Vasant more to join uddhav thackeray shivsena : वंचितची साथ सोडून वसंत मोरे ९ जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसे सोडून २ महिन्यां पूर्वी ते वंचित मध्ये गेले होते. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवणारे वसंत मोरे आता…

Read More

मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सहकाऱ्यांच्या साथीने घेतला ‘मिलेट भोजनाचा आस्वाद’

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील कँटीनमध्ये खास ”मिलेट महोत्सव – २०२४” चे आयोजन करण्यात आले होते. विधिमंडळातील सर्व आमदारांसाठी मिलेट म्हणजे कडधान्य, भरडधान्य यापासून बनलेले जेवणही ठेवण्यात आले होते. सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय राठोड, मंत्री…

Read More

मुंबईत तीन बड्या नेत्यांची गुप्त बैठक ; मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार ?

BREAKING : शिवसेनेचा एक खासदार वाढणार का ? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “याचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, आपण त्यांना विचारा,” अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची आज बंद दाराआड चर्चा झाली आहे. या गुप्त बैठकीचा…

Read More

मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना: महिलांची अडवणूक केल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या ‘सुंदर’ नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. दरम्यान या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली…

Read More
Top
error: Content is protected !!