Home » जळगाव जिल्हा

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप; योगिता शर्माचा प्रबंध भारतात द्वितीय!

पनवेलच्या पिल्लई कॉलेजची विद्यार्थीनी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पेपर डॉ. शिल्पा पंकज केवटे यांचे लाभले मार्गदर्शन वास्तव पोस्ट (प्रतिनिधी)जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई…

Read More

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’…

जैन हिल्सवर अनोखी ‘Morning Journey’ मध्ये ध्यान, संगीत, फ्री-फ्लो डान्सचा जळगावकरांनी घेतला आनंद! जळगाव, दि. २७ दीपक जाधव : जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात उगवत्या सूर्याच्या साक्षीने जळगावकरांनी धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रमाची अनुभूती घेतली. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लि., राजर्षी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि.२९ एप्रिल रोजी करण्यात आले. नेस्ले सामाजिक उपक्रमांतर्गत झालेल्या या शिबीरात १३५ रूग्णांनी लाभ घेतला. याप्रसंगी डॉ. अमीत भास्कर, डॉ. यज्ञेश चौधरी, हर्षा नन्नवरे, तेजस पाटील,…

Read More

भुसावळ RPF ची कामगिरी; वर्षभरात ४८३ मुलांची सुटका, तर १.७२ कोटींचा ऐवज हस्तगत

भुसावळ l वास्तव पोस्ट वृत्तसेवा “सेवा ही संकल्प” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) भुसावळ विभागाने ‘खंबीर तरीही मानवी’ (Firm but Humane) या धोरणाने कार्य करत गुन्हेगारी रोखण्यासोबतच सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. प्रमुख मोहिमा…

Read More

मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्ग

रोटरी जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार वैजापूर l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​वैजापूर ता.चोपडा ( प्रतिनिधी ): मोहफुलांचा वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करता, त्यापासून पौष्टिक अन्नपदार्थ बनवल्यास महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग (यावल) चे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन…

Read More

जामनेर तालुक्यात विकासाचा मार्ग प्रशस्त; तोंडापूर-हाडोळा सिमेंट रस्त्याचे गिरीष महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

जामनेर l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​तोंडापूर (प्रतिनिधी):जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ आणि वेगवान करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, याच पावलाचा एक भाग म्हणून तोंडापूर ते हाडोळा या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते या नूतन मार्गाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. ​पायाभूत सुविधांना…

Read More

कुरंगीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा नांद्रा (ता.पाचोरा) कुरंगी येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूची अनधिकृतरीत्या वाहतूकीच्या ट्रॅक्टर वर पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुरंगी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय पाचोरा येथे जमा केले. आज दि. २०मार्च, शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता भरत नन्नवरे मंडळ अधिकारी…

Read More

जि.प. सदस्य पदम बापू पाटील ॲक्शन मोडमध्ये, शेतकरी कर्जमाफी गावनिहाय याद्या जाहीर करा

पाचोरा l वास्तव पोस्ट : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी करत मा. जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांनी पाचोरा येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेअंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२५…

Read More

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा ; एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

वास्तव पोस्ट l एरंडोल : येथील ॲड. ओम त्रिवेदी व रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाशने आय.आय.टी. कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत बी….

Read More

भविष्याची पिढी घडविणारा विद्येचे जादूगर : मुख्याध्यापक गणेश बच्छाव

वास्तव पोस्ट l जळगाव : तालुक्यातील म्हसावद गावातील स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय – ८०च्या दशकात उभी राहिलेली गरीब-गरजू विद्यार्थ्यांची शाळा. मातीचा सुगंध, साधी वर्गखोली, मर्यादित साधन सामग्री; पण स्वप्न मात्र मोठी. १९९७-९८ चा तो कार्यकाळ अनेकांच्या आयुष्यात परिवर्तनाचा टप्पा ठरला. कारण त्या वर्षी शाळेत आले गणेश बच्छाव सर. सर वर्गात…

Read More

थेपडे विद्यालय म्हसावद येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

​वास्तव पोस्ट l म्हसावद : स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालययात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘मानवता हीच खरी ईश्वर सेवा’ हा संदेश देणाऱ्या या थोर संताच्या विचारांचा जागर याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.डी. बच्छाव, उप मुख्याध्यापक एस.के. भंगाळे…

Read More

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवादास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वास्तव पोस्ट l जळगाव : जैन फार्म फ्रेश फूड्स लि. (जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी) आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टोमॅटो पिक परिसंवाद’ संपन्न झाला. पिंगळवाडे मुडी रोडवरील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वसंत पाटील यांच्या शेतात हा कार्यक्रम झाला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोमॅटो…

Read More

सामाजिक चळवळीचा विधी तज्ञ– लोकसेवेची अखंड ज्योत : राज गायकवाड

वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्ह्यातील रावेर या मातीतून उगवलेले नाव म्हणजे राज गायकवाड. साधी परिस्थिती, जेमतेम घरची आर्थिक अवस्था… पण मन मात्र प्रचंड मोठं. सामाजिक चळवळीचा विधी तज्ञ आणि माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्यांनी लोकांच्या हक्कासाठी उभं राहण्याचा निर्धार केला आणि तो आजही तेवढ्याच ताकदीने पाळत आहेत. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित…

Read More

गिरणेश्वर महादेव – गिरणाकाठी साक्षात श्रद्धेचा अवतार

वास्तव पोस्ट | जळगाव : तालुक्यातील म्हसावद गावाच्या इंदिरानगर भागात, गिरणा नदीच्या शांत पण सामर्थ्यशाली काठावर उभं असलेलं गिरणेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही, तर श्रद्धा, चमत्कार आणि भक्तीची जिवंत गाथा आहे. साल १९५०…गिरणा नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुरात वाहत्या प्रवाहासोबत महादेवाचे पवित्र स्थळ गिरणा काठावर येऊन स्थानबद्ध झाले. कुठलाही मानवी प्रयत्न नाही,…

Read More

एकच ध्यास : माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी – नायब तहसीलदार संजय तायडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘लोकांचे तत्परतेने केलेले काम व त्यांचे समाधान हीच चांगल्या प्रशासनाची खरी सेवा’ या ब्रिद वाक्याचा अर्थ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसतो तो रावेर तालुक्यातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या कामगिरीत. तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत “माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी” हा एकच ध्यास मनाशी बाळगून…

Read More
Top
error: Content is protected !!