Headlines

दिपक जाधव

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि.२३ शुक्रवार रोजी पहाटे ३ वाजून २ मिनिटांनी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना २१ फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. हृद्यविकाराचा झटका आल्याने…

Read More

सर्वोच्च न्यायालयाचा पत्रकारांच्या बाबतीत पोलिस प्रशासन व प्रशासकीय अधिकारींना सज्जड इशारा

नवी दिल्ली, दि.२२( वास्तव पोस्ट न्यूज ) – सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले की, घटनेच्या कलम १९ आणि २२ नुसार पोलीस कोणत्याही पत्रकाराची सूत्रे विचारू शकत नाहीत आणि जोपर्यंत तपास आणि ठोस पुराव्याशिवाय पत्रकारांवर दाखल झालेले गुन्हे आणि साक्ष तपासली जात…

Read More

जिल्हा वार्षिक नियोजन मधून स्पीलचे कामं ३१ मार्चच्या आत पूर्ण करा ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्हा वार्षिक नियोजन मधून सन २०२२-२३ मध्ये दिलेल्या मान्यताचे स्पीलचे काम करायचे असेल तर त्याच्यासाठी ३१ मार्चची मुदत असेल. त्यानंतर लागणारा निधी जिल्हा नियोजन मधून दिला जाणार नाही असे स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक नियोजन मधून दिलेल्या विविध शासकीय कामाचा आढावा अल्प बचत भवन…

Read More

राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सवानिमित्त गाडगे बाबा उद्यानात विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शहरातील जळगाव जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व समाजातील विविध समाज संस्था सर्वसमावेशक यांच्यावतीने दि.२३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी समाज शिरोमणी, स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत संत गाडगेबाबा जयंती उत्सव विविध कार्यक्रमद्वारे साजरा करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागातून शोभा यात्रा संत गाडगेबाबा उद्यानात येतील तेथून मुख्य मिरवणुकीस सुरवात होईल. मिरवणुकीत…

Read More

कजगाव येथे श्री विश्वकर्मा जयंती साजरी

कजगाव , दि.२२, ( वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर | कजगाव येथे आज श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली गावातील सुतार बांधवांकडून श्री विश्वकर्मा जयंती निमित्त संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच कजगाव येथील लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व सुतार बांधव ,महिला तसेच…

Read More

‘नमो दिव्यांग शक्ती’ अभियानांतर्गत राज्यात ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प

मुंबई, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘नमो दिव्यांग शक्ती’ अभियानांतर्गत राज्यात ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. यात दिव्यांगाना…

Read More

मोठी बातमी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

नवी दिल्ली, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) छापा टाकल्याची बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या कार्यकाळात किश्तवाडमधील जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित फायली निकाली काढण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप मलिक यांनी केला होता. सत्यपाल…

Read More

जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत एकोणचाळीस हेक्टर पेक्षा जास्त वनहक्क दावे मंजूर

जळगाव दि. २२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) जळगाव जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्क दावेदारांच्या दाव्यांना मान्यता देण्यात आली असून दावेदारांना एकूण ३९.८९१ हेक्टर आर जमीनीचे वनपट्टे मंजुर करण्यात आले आहेत. प्रलंबित उर्वरित वनदावेदारांचे दावे तात्काळ कार्यवाही करुन निकाली काढण्यात येतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार याबाबत निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.२१ फेब्रुवारी…

Read More

जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळांची चलचित्रफीत प्रसारीत

जळगाव, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जळगाव जिल्ह्याच्या महत्वाच्या स्थळांच्या प्रचारासाठी चलचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. पर्यटनामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच जिल्ह्यात रोजगार देखील उपलब्ध होईल. जळगाव जिल्हावासीयांनी विविध समाजमाध्यमात सदर चलचित्रफीत शेअर करुन आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रांना जळगाव जिल्ह्यात पर्यटनासाठी निमंत्रित करावे व जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे…

Read More

कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ; १ नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर बॉक्समध्ये सापडले ५४ डेटोनेटर

कल्याण, दि.२२( वास्तव पोस्ट न्यूज )– कल्याण रेल्वे स्थानकाच्या १ नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर ५४ डेटोनेटर सापडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या ह्या डेटोनेटर मुळे कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रेल्वे पोलीस, बॉम्ब शोध पथकं दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. सविस्तर वृत्त असे की, कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर १ जवळ पिंपळाच्या झाडाखाली…

Read More

बारामती साठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर ;अतिरिक्त जमीन एमआयडीसी कडून मिळणार

मुंबई, दि.२२ ( वात्सव पोस्ट जळगाव ) – कामगार मंत्रालयाने बारामतीसाठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. भविष्यातील वाढत्या औद्योगिक वसाहतीची गरज लक्षात घेता येथे २०० खाटांच्या रुग्णालयासाठी आवश्यक असणारी अतिरिक्त जमीन एमआयडीसी मार्फत उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. दरम्यान बारामती औद्योगिक वसाहत संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. केंद्र शासनाच्या कामगार…

Read More

एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव पोलिसांची तिघांविरुद्ध कारवाई

जळगाव, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– पोलिसांकडून तिघा गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील राकेश मधुकर कोळी (रा. भोलाणे ता. जि. जळगाव), हुसेन सरदार तडवी (रा. चिलगाव ता. जामनेर) आणि सुरज अशोकराव भोगे ऊर्फ भांगे (रा. पापा नगर, राणी मोहल्ला, भुसावळ) अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत….

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती

जळगाव, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँगेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव महानगरातून…

Read More

जळगाव मध्ये २३ फेब्रुवारी पासून होणार नाशिक महसूल विभागाच्या, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जळगाव दि. २१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २३ फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते २३ रोजी सकाळी ९:०० वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री…

Read More

आंध्र प्रदेश सारखी ‘स्वतंत्र पेंशन योजना’ महाराष्ट्रातही करावी ; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )- शासनाने राज्यातील २००५ नंतरच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतील सर्व लाभांची हमी देणारी आंध्रप्रदेश सरकारच्या पेन्शन योजनेवर आधारित महाराष्ट्राची शासनाची एक ‘स्वतंत्र पेन्शन योजना’ करावी. अशी मागणी विधान परिषद सदस्य सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे ….

Read More
error: Content is protected !!