जैन इरिगेशनचे कॅरम पट्टू संदीप दिवे आणि अभिजीत त्रिपणकर यांना शिवछत्रपती पुरस्कार घोषित
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षाकरीता कालच घोषित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये कॅरम ह्या खेळाकरिता जैन इरिगेशनचे खेळाडू संदीप दिवे (मुंबई) आणि अभिजीत त्रिपाणकर (पुणे) यांना खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्येही जैन इरिगेशनचीच माजी खेळाडू कुमारी नीलम घोडके (मुंबई) हिला सुद्धा…
