Headlines
Home » जळगाव जिल्हा » भडगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा…

भडगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा…

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा या ठिकाणी प्रजासत्ताक २६ जानेवारी रोजी या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास महाजन यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मिठाई वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक वसंत पाटील व शालेय समितीचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच उपशिक्षक ध्रुवसिंग पाटील पप्पू पाटील तसेच परिसरातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मान्यवरांची व शाळेतील मुख्याध्यापकांचे शिक्षकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध्रुवसिंग पाटील यांनी केले. तर आभार शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!