जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रिकेट कोणतेही असो आज प्रत्येक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक क्षेत्रात आपले शंभर टक्के योगदान देत असतो. यातच आपल्याल्या त्यांच्याकडून मैदानावर अनेक चमत्कार बघायला मिळत असतात. ग्लेन मॅक्सवेलने आज असाच एक पराक्रम केला. ग्लेन मॅक्सवेलने घेतलेला अविश्वसनीय वाटेल असा ‘तो’ झेल क्रिकेट जगताने बघितला. बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलने हा अप्रतिम झेल घेतला असून सामाजिक माध्यमांमध्ये त्याचे कौतुक होतं आहे.
अविश्वसनीय म्हणावे असे अनेक प्रसंग क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच घडत असतात. त्यात कठीण झेल, धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या चमत्काराचा समावेश असतो. गेल्यावर्षी भारताच्या सूर्यकुमार यादव याने देखील टी-20 विश्वकप च्या अंतिम सामान्यात अफलातून झेल पकडून टी-20 विश्वकप भारताने आपल्या नावे केला होता.
मात्र, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने आज बुधवार दि.१ रोजी केएफसी बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील सामन्यात एक अप्रतिम झेल घेतला. या कॅचचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमी पुन्हा पुन्हा हा झेल पाहत आहेत.
धडाकेबाज फलंदाज विल प्रेस्टविज यानं डॅन लॉरेन्सच्या चेंडूवर लॉग- ऑनवर एक जोरदार फटका मारला. हा चेंडू थेट सीमारेषे पार गेला. चेंडूचा पाठलाग करताना मॅक्सवेलही सीमारेषेच्या बाहेर गेला. सीमारेषेबाहेर घेतलेला झेल हा षटकार असतो. मात्र, मॅक्सवेलने इथेच प्रसंगावधान व हुशारी दाखवत सीमारेषेबाहेर चेंडू हवेतच पकडला. मात्र आपले पाय जमिनीवर पडण्याआधी मॅक्सवेलने हा चेंडू सीमारेषेच्या आत उंचावर ढकलला. चेंडू पुन्हा खाली पडण्याआधी मॅक्सवेल सीमारेषेच्या आत आला आणि त्यानं तो झेल टिपला.
