Headlines
Home » क्राईम » वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध ; आरोपी अटकेत

वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध ; आरोपी अटकेत

छत्तीसगड दि.७ ( प्रतिनिधी ) – छत्तीसगड राज्या मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ व्यक्तींना अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की एका ३० वर्षांच्या महिलेची तिच्या नात्यातीलच २ व्यक्तींनी हत्या करुन तिच्या मृत देहबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .छत्तीसगडमधील पारसगुडी येथील हरितमा गावामध्ये हा प्रकार घडला आहे. या महिलेची हत्या ३० जानेवारी रोजी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपसाअंती रविवारी या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असुन मृत महिलेचा दीर आहे. हा आरोपी केवळ १७ वर्षांचा आहे. महिलेच्या पतीच्या भावाने त्यांच्याच नात्यातील व्यक्तीच्या मदतीने तिची हत्या केल्याच पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही मृत महिला तिच्या पतीबरोबर स्थायिक झाली होती . सुरगुंज जिल्ह्यातील अकोला येथे कामानिमित्त हे दोघे पारसगुडीपासून काही किलोमीटरवर असलेल्या अंतरावर हे दोघे राहण्यासाठी आले होते. ज्या दिवशी या महिलेची हत्या झाली त्या दिवशी आरोपींनी “शेतीची कामं असल्याने आज इकडे ये असं या महिलेला सांगितलं आणि मूळ गावी म्हणजेच हरितमा गावामध्ये तिला बोलावून घेतलं.”

त्या रात्री नेमकं काय घडलं ?
त्याच रात्री या महिलेची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. “रात्री दोन्ही आरोपींनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर अल्पवयीन आरोपीने दारुच्या नशेत या महिलेचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळला आणि तिची हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळून जाणाऱ्या गावकऱ्याला या महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरु केला. तपास या दोन आरोपींपर्यंत येऊन थांबला असता त्यांनी गुन्हा कबूल केला. आम्हीच या महिलेची हत्या केली असून तिच्या मृतदेहबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचं दोघांनी त्यांच्या कबुलीमध्ये सांगितलं,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सध्या पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये या दोन मद्यधुंद व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणाचा हात आहे का? यादिशेने पोलीस या प्रकरणामध्ये पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!