Headlines
Home » राजकीय » खासदार सुप्रिया सुळे यांची सिटू आणि माकपा च्या नेत्यांनी घेतली भेट

खासदार सुप्रिया सुळे यांची सिटू आणि माकपा च्या नेत्यांनी घेतली भेट

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड नाशिक येथे माजी आमदार कॉ. जीवा पांडू गावित, सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष व माकपा पक्षाचे नेते डॉ.डी.एल. कराड यांनी भेट घेतली.

या भेटीदरम्यान नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा व नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी आघाडीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नक्कीच उमेदवारी जाहीर करण्यात येणार असे सांगितले.

या भेटीदरम्यान दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे हे देखील उपस्थित होते. तसेच सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. सिताराम ठोंबरे, माजी नगरसेवक ॲड. तानाजी आप्पा जायभावे, सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे, कॉ.मोहन जाधव, कॉ.अरविंद शहापुरे, कॉ. युवराज पाटील यांनी सिटूच्या वतीने भेट घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!