Home » होम » सिडको विभागीय आयुक्तांना रस्त्यांच्या समस्येबाबत माकपाचे निवेदन

सिडको विभागीय आयुक्तांना रस्त्यांच्या समस्येबाबत माकपाचे निवेदन

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक ३१ मध्ये रस्त्याची झालेली दुरवस्था, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व स्थानिक नागरिक आपला संताप व्यक्त करत आहे गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणूका न झाल्यामुळे आज नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार व नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे असे स्थानिक नागरिक यांचे म्हणणे आहे. माकपा शिष्ट मंडळाच्या वतीने पाथर्डी फाटा प्रभाग ३१मध्ये पाहाणी दौरा केला असता नरहरी नगर, निसर्ग कॉलनी, स्ट्रॉबेरी स्कूल, ज्ञानेश्वर नगर, मुरलीधर नगर, दामोदर नगर, ओम गुरुदेव नगर, आनंद नगर, मोरेश्वर नगर, स्वप्नपूर्ती नगर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तसेच इतर परिसरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचे आढळून आले.

तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेसमोर रस्ता स्वप्नपूर्ती नगर, ओम गुरुदेव नगर व मोरेश्वर नगर या भागात स्ट्रीट लाईट नाहीत, कॉर्पोरेशनच्या पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही. कुठलीही सुविधा व्यवस्थित मिळत नसताना देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरपट्टी देण्यात आलेली आहे. या सर्व समस्यांचे निवेदन विभागीय आयुक्त डॉ.सुनिता कुमावत मॅडम यांना देण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.सुनीता कुमावत यांनी लवकरात लवकर सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.

यावेळी माकपाचे राज्य कमिटी सदस्य कॉ.सिताराम ठोंबरे, कॉ.देविदास आडोळे, कॉ.संतोष काकडे, कॉ.विवेक ढगे, कॉ.सतीश खैरनार,कॉ.आत्माराम डावरे, कॉ.दत्ता राक्षे, कॉ.पांडुरंग काटकर, कॉ.राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!