Headlines
Home » सामाजिक » नाते संबंधांना रिस्टार्ट करा

नाते संबंधांना रिस्टार्ट करा

आपण आजच्या लेखात नात्यांना जरा रीस्टार्ट करा या विषयी थोडस बोलणार आहोत. आपण सर्व लोक फक्त पैशाच्या मागे धावत आहोत आणि त्यात आपण इतके भरकटले गेलो की आपण कुठल्याही नाते संबंधाचा आदर करु इच्छीत नाही. याला नेमके काय कारण असेल तर फक्त पैसा. पैशापुढे आपणास सारे जग फीके वाटायला लागले आहे. ही खरीतर फार मोठी शोकांतिका आहे. सर्वच विषय पैशाने होत नाहीत. ही गोष्ट आपण समजुन घेणे आवश्यक आहे. अती पैसा कमवायच्या नादात आपण शेकडो नाती गोती मागे टाकत चाललो आहोत. मला कुणाचीही गरज नाही, मी माझे बघुन घेईल, असे एक नाही तर अनेक अभद्र शब्द आपण बोलत असतो. आपल्या रक्ताचा नात्यांना आपण दुर सारत असतो.

खरे तर आपण पैसा कितीही कमवला तरी नाते विकत मिळत नाहीत. खर तर माणसा जवळ सुख दुःखात माणुसच लागतो. हे विसरता कामा नाही. आपण कितीही संपत्ती कमवली तरी ती आपण गेल्यावर सर्व इथेच राहाणार आहे. आपण कमवलेली माणसांची श्रीमंतीच खरी आपल्या सोबत राहाणार आहे. अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणुन मित्रांनो नात्यांना रीस्टार्ट करा आणि आपले आयुष्य सुखकर करा.

कुणीच कुणाच्या जवळ नाही
हीच खरी समस्या आहे
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी
आणि अमावस्या जास्त आहे .

हल्ली माणसं पहिल्या सारखं
दुःख कुणाला सांगत नाहीत
मनाचा कोंडमारा होतोय
म्हणून आनंदी दिसत नाहीत .

एवढंच काय
एका छता खाली राहणारी तरी
माणसं जवळ राहिलीत का ?
हसत खेळत गप्पा मारणारी
कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?

अपवाद म्हणून असतील काही
पण प्रमाण खूप कमी झालंय
पैश्याच्या मागे धावता धावता
दुःख खूप वाट्याला आलंय.

नातेवाईक व कुटुंबातले
फक्त एकमेकाला बघतात
एखाद दुसरा शब्द बोलतात
पण काळजातलं दुःख दाबतात.

जाणे येणे न ठेवणे, न भेटणे, न बोलणे
या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका
गाठी उकलायचा प्रयत्न करा
जास्त गच्च होऊ देऊ नका.

धावपळ करून काय मिळवतो
याचा जरा विचार करा
बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा
आपल्या माणसांची मनं भरा .

एकमेका जवळ बसावं बोलावं
आणि नेहमी नेहमी
तिरपं चालण्याच्या ऐवजी
थोडं सरळ रेषेत चालावं

समुद्री चोहीकडे पाणी
आणि पिण्याला थेंबही नाही
अशी अवस्था झालीय माणसाची
यातून लवकर बाहेर पडा.

माणसं अन माणुसकी नसलेली घरे
अन देव नसलेले देव्हारे
कितीही पॉश असले
तरी त्याचा काय उपयोग.

सौ.भारती ज्ञा. कुमावत
काऊंसेलर जळगाव
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जळगाव
समाजसेविका

2 thoughts on “नाते संबंधांना रिस्टार्ट करा

  1. अतिशय सुंदर लेख आपण लिहिलं आहे,आजची सत्य परिस्थिती आपण मांडलेली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!