Home » आंतरराष्ट्रीय » मायक्रोसॉफ्ट सर्वर डाउन ; जगभरातील अत्यावश्यक सेवा ठप्प !

मायक्रोसॉफ्ट सर्वर डाउन ; जगभरातील अत्यावश्यक सेवा ठप्प !

Microsoft Cloud Outage: Microsoft चे सर्व्हर ठप्प झाल्याने जगभरातील अत्यावश्यक सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. विंडोजवर काम करणाऱ्या प्रणालींना आलेल्या समस्येमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. Crowd Strike च्या सेवांवर परिणाम होत असल्यामुळे लोकांच्या सिस्टीम बंद पडत आहेत.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद झाल्यामुळे जगभरातील बऱ्याच लोकांना त्यांच्या विंडोज सिस्टमवर निळ्या स्क्रीनची समस्या भेडसावत आहे. बँकांपासून एअरलाइन्सपर्यंतच्या सर्वच सेवा विस्कळीत झाल्यमुळे जगभरात गोंधळ माजला आहे. कंपनीच्या फॉर्मवरील पिन संदेशानुसार, अनेक विंडोज यूजर्संना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) त्रुटी दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच क्राउड स्क्रीम अपडेट करण्यात आले होते त्यानंतर ही समस्या येत आहे. मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली आहे. या समस्येने मोठ्या प्रमाणात लोक त्रस्त झाले आहेत. आज सकाळी माइक्रोसॉफ्ट क्लाउड सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत.

का आली Microsoft मध्ये एवढी मोठी अडचण ?

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस अपडेटनुसार, या समस्येचे प्राथमिक कारण म्हणजे Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये करण्यात आलेला बदल आहे. ज्यामुळे स्टोरेज आणि कम्प्युटर रिसोर्सेस यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत आणि परिणामी कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण होत आहे.

या समस्येमुळे मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवा प्रभावित झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मायक्रोसॉफ्टसोबत काम करणाऱ्या CrowdStrike ने ही समस्या मान्य केली आहे. CrowdStrike ही एक सायबर सुरक्षा फर्म आहे. या फर्मच्या अभियंत्यांनी समस्या निर्माण करणारी सामग्री शोधून काढली आहे आणि केलेले बदल हे दुरुस्त करून त्यांना पूर्ववत करण्यात येत आहे.

CrowdScream ने ही समस्या मान्य केली आहे आणि या बगचं नेमकं कारण काय हे ते शोधून काढत आहेत. CrowdStrike ने याबद्दल लिहिले आहे की, ‘आम्हाला या त्रुटीची जाणीव आहे, जी विंडोज सिस्टममध्ये दिसत आहे.’

या समस्येमुळे लाखो वापरकर्त्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. काही यूजर्सची सिस्टम एकतर बंद झाली आहे किंवा त्यांना ब्लू स्क्रीन समस्येचा सामना करावा लागत आहे. मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक विमानतळावरील संगणक बंद असताना, बोर्डिंग पास हाताने बनवून प्रवाशांना दिले जात होते. अक्षय कोठारी नावाच्या ‘एक्स’ वापरकर्त्याने हाताने बनवलेल्या फ्लाइट बोर्डिंग पासचा फोटोही शेअर केला आहे.

कोठारी यांनी लिहिले, “Microsoft/CrowdStrike आउटेजमुळे भारतातील बहुतेक विमानतळ बंद झाले आहेत. “आज मला माझा पहिला हस्तलिखित बोर्डिंग पास मिळाला.” त्याच्या पोस्टवर काही लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. टेकऑफ आणि लँडिंगमध्ये नाही… खरं तर जगभरातील विमानतळांवर फ्लाइट्स थांबल्या आहेत.

आपत्कालीन सेवा ठप्प झाल्या आहेत :

अनेक देशांमध्ये आपत्कालीन सेवा ठप्प झाल्या आहेत. अमेरिकेतील पोलिसांनी पुष्टी केली आहे की आपत्कालीन सेवा क्रमांक ९११ काम करत नाही. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत, आउटेजच्या वेळी एका कॉलवर मदत मिळणे आता शक्य होणार नाही आणि मदत घेण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याचा जुना पर्याय शिल्लक आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील समस्येने आज बँका, रुग्णालये, विमानतळ, वृत्तवाहिन्या, शेअर बाजार आणि सुपरमार्केटही हादरले आहेत. मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे, संगणक किंवा लॅपटॉपची स्क्रीन अचानक निळी होत आहे (ब्लू स्क्रीन ऑफ डेथ) आणि संगणक स्वतःच बंद होत आहेत आणि पुन्हा सुरू होत आहेत. Microsoft 360, Microsoft Windows, Microsoft Teams, Microsoft Azure, Microsoft Store आणि Microsoft क्लाउड-संचालित सेवा बंद पडल्यामुळे ऑनलाइन सेवा अचानक ‘गायब’ झाल्या. त्यामुळे संगणक येण्यापूर्वीचे दृश्य विमानतळ आणि रुग्णालयांमध्ये पाहायला मिळाले.

इंग्लंडमध्ये मायक्रोसॉफ्ट सेवा बंद पडल्यामुळे अनेक इस्पितळांचे संगणक बंद पडले. अनेक रुग्णालये EMIS मध्ये प्रवेश करू शकत नाहीत, जीपी संगणक प्रणाली यूके NHS द्वारे चालू आहे. यामुळे, ते रुग्णांच्या नोंदींमध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा रुग्णांना भेटी देऊ शकत नाहीत. काही रुग्णालयांनी तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची नावे रजिस्टरमध्ये लिहून काम सांभाळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!