Home » क्रीडा » जळगाव जिल्हा अजिंक्यपद व निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२४

जळगाव जिल्हा अजिंक्यपद व निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२४

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व फेदर्स बॅडमिंटन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व आर्य मल्टीपर्पज फॅाउंडेशन, जळगाव प्रायोजित “जळगाव जिल्हा अजिंक्यपद व निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२४” या स्पर्धा शनिवार, दिनांक २९ जून ते रविवार, दिनांक ३० जून २०२४ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा स्वरूपात घेतल्या जातील.

या स्पर्धे मधील खेडाळूना निवड करण्यात येणार आहे आणि निवड झालेले खेडाळू जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व येणाऱ्या महाराष्ष्ट्र राज्य आंतर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत करतील, ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनद्वारे आयोजित केले जाते.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात. नाव नोंदणीची अंतिम दिनांक २५ जून २०२४ असून संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी व माहितीसाठी किशोर सिंह (मोबाईल नंबर- ०९४२११२११०६ ), पत्ता:- कांताई सभागृह जैन स्पोर्ट्स अकॅडमी, नवीन बस स्टँड जवळ, जळगाव. यांच्याशी संपर्क साधावा.

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!