Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » ‘ईव्हीएम हॅक होऊ शकते’, ते बंद केले पाहिजे ; एलोन मस्कचा मोठा दावा

‘ईव्हीएम हॅक होऊ शकते’, ते बंद केले पाहिजे ; एलोन मस्कचा मोठा दावा

We should eliminate EVM : एलोन मस्क म्हणाले की ईव्हीएम हॅक होऊ शकतात त्यामुळे आपण ते बंद केले पाहिजेत. यासोबतच त्यांनी अमेरिकन निवडणुकांमधून देखील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) काढून टाकण्याची मागणी केली.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) धक्कादायक दावा केला आहे. एलोन मस्क म्हणाले की ईव्हीएम हॅक होऊ शकतात त्यामुळे त्याचा वापर बंद केले पाहिजे. यासोबतच त्यांनी अमेरिकन निवडणुकांमधून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) काढून टाकण्याची मागणी केली.

स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी आपले हे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या X अकॉउंट वरील पोस्टवर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे.

खरं तर, केनेडी ज्युनियर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोर्तो रिकोच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये ईव्हीएमशी संबंधित कथित मतदानाच्या अनियमिततेबद्दल बोलले होते. केनेडी ज्युनियरने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की जेथे पेपर ट्रेल नाही तेथे काय होते? केनेडी ज्युनियर म्हणाले की अमेरिकन नागरिकांसाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की त्यांच्या प्रत्येक मताची मोजणी झाली आहे आणि त्यांच्या निवडणुकीत छेडछाड केली जाऊ शकत नाही.

रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर आपल्या पोस्ट मध्ये पुढे म्हणाले की निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांना कागदी मतपत्रिकांवर परतावे लागेल. केनेडी ज्युनियरच्या X वरील पोस्टला प्रतिसाद देताना, एलोन मस्क यांनी लिहिले की, “आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून टाकली पाहिजेत. मानव किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका खूप जास्त आहे.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!