Home » राजकीय » एक्झिट पोलच्या आकड्यांनी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं

एक्झिट पोलच्या आकड्यांनी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं

एक्झिट पोलच्या आकड्यांनी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं Lok Sabha Elections 2024 Exit Poll : मोदी सरकार तिसऱ्यांदा केंद्रात येणार असल्याचा अंदाज आहे. मात्र भाजपने ‘अब की बार 400 पार’चा जो नारा दिला होता, त्यापासून ते काहीसे दूर राहत असल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान आज संध्याकाळी पूर्ण झाले असुन येत्या ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्याआधी आज संध्याकाळी अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल जारी केले आहेत. या पोलची आकड़ेवारी बघता इंडिया आघाडीच्या नेत्यांची झोप उडाली आहे.

आज आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारी नुसार एन डी ए सरकार तिसऱ्यांदा केंद्रात येणार असल्याचा अंदाज आहे. मात्र भाजपने ‘अब की ४०० पार’चा जो नारा दिला होता, तो एकाही सर्वेत पुर्ण झालेला दिसत नाही. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांसाठी मतदान पार पडलं. बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे. पोल ऑफ पोल्सच्या आकडेवारीनुसार एनडीएला ३६१ जागा, इंडिया आघाडीला १४५ जागा आणि ३७ जागांवर इतर जिंकण्याची शक्यता आहे. म्हणजेच एनडीए बहुमताने केंंद्रात आपली सत्ता स्थापन करु शकते.

रिपब्लिक भारत मेट्रिजच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३५३ ते ३६८ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर इंडिया आघाडी ११८ ते १३३ जागांवर तर इतर ४३ ते ४८ जागांवर जिंकण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्ही पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला ३५९, इंडिया आघाडीला १५४ आणि इतरांना ३० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया न्यूज डायनामिक्सच्या एक्झिट पोलनुसार, एनडीए ३७१, इंडिया आघाडी १२५ आणि इतरांना ४७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. जन की बातच्या एक्झिट पोलनुसार, ३६२ ते ३९२ जागा, इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा आणि इतर १० ते २० जागांवर जिंकू शकतात.

इंडिया टीव्ही CNXच्या आकडेवारीनुसार एनडीए ३७१ ते ४०१ जागा जिंकू शकते. तर इंडिया आघाडी १०९ ते १३९ जागा, तर इतर २८-३३ जागांवर विजयी होऊ शकतात.

देनिक भास्करच्या एक्जिट पोलनुसार, एनडीए ३५३ ते ३६८, इंडिया आघाडी १४५ ते २०१, इतर ३३ ते ४९ जागांवर विजयी होऊ शकतात, असा अंदाज आहे. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार एनडीएल ३४२ ते ३७८, इंडिया आघाडी १५३ ते १६९, तर इतर २१ ते २३ जागांवर जिंकण्याचा अंदाज आहे. इंडिया न्यूज- पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, एनडीए ३७१, इंडिया आघाडी १२५ तर इतरांना ४७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!