मुंबई | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – IPL-2024 पर्वात ६८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ १९७ धावाच करू शकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६ सामने जिंकून आयपीएलच्या प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश करत RCB ने चौथे स्थान पटकावले.
पावसाच्या व्यत्ययात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हायस्कोरिंग सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट घेत सीएसकेला पराभवाकडे ढकलले. आरसीबीचे १४ सामन्यांत १४ गुण झाले आहेत. त्यांनी सीएसकेला मागे धावगतीत मागे टाकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. यश दयालने शेवटच्या षटकात सामना फिरवत सीएसकेचे ११ व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंग केले.
आरसीबीकडून फलंदाजी करताना कोहलीने कर्णधार फाफ डू प्लेसिस सोबत पहिल्या विकेटसाठी ७८ (५८ चेंडू) धावांची भागीदारी केली. करा किंवा मरा या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आरसीबीसाठी विराट कोहलीने २९ चेंडूत ४७ धावा, फाफ डू प्लेसिसने ३९ चेंडूत ५४ धावा, रजत पाटीदारने २३ चेंडूत ४१ धावा आणि कॅमेरून ग्रीनने १७ चेंडूत नाबाद ३८ धावा करून २० षटकांत ४ गडी गमावून २१८ धावा केल्या.
तर चेन्नई सुपर किंग्सकडून शार्दूल ठाकूरने २ तर मिचेल सॅटनर आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी १ विकेट घेतल्या. आरसीबीने ५ विकेट्स गमावून २० ओव्हर्समध्ये २१८ धावा केल्या आणि विजयासाठी चेन्नईपुढे २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रत्युत्तरात, चेन्नईला ७ बाद १९१ धावाच करता आल्या आणि २७ धावांनी त्यांचा पराभव झाला. ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडची विकेट मिळवली. रचिन रवींद्र व अजिंक्य (३३) यांनी ६६ धावांची भागीदारी केली. रचीन ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांवर रन आऊट झाल्याने मॅच फिरली. त्यात १५व्या षटकात मिचेल सँटनरचा (३) अफलातून झेल घेऊन फॅफ ड्यू प्लेसिसने सामन्याचा निकाल निश्चित केला.
CSK ला प्ले ऑफसाठी १२ चेंडूंत ३५ धावा करायच्या होत्या आणि जडेजा व महेंद्रसिंग धोनी ही अनुभवी जोडी मैदानावर होती. १९व्या षटकात दोघांनी १८ धावा चोपल्या आणि २७ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. ६ चेंडूंत १७ धावा चेन्नईला प्ले ऑफच्या तिकीटासाठी हव्या होत्या. धोनीने पहिलाच फुलटॉस चेंडू ११० मीटर लांब षटकार खेचला. या पर्वातील हा सर्वात लांबचा षटकार ठरला. ३ चेंडूंत ११ थावा हव्या होत्या. २ चेंडू १० धावा असताना जडेजा स्ट्राईकवर आला. पण, यश दयालने दोन डॉट बॉल टाकले. आणि चेन्नईला २७ धावांनी हरवले. चेन्नईला ७ बाद १९१ धावा करता आल्या. जडेजा २२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला.
