कजगाव दि.२२ वास्तव पोस्ट, दीपक अमृतकर-(प्रतिनिधी) कजगाव येथे भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळपासूनच गावात जल्लोषाचे वातावरण होते. सर्वत्र राममय तसेच भगवे असे गाव झालेले दिसून येत होते. गावात रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली. ग्रामस्थांनी घरावर गुढी तसेच भगवा ध्वज उभारला होता. मिरवणुकीत ग्रामस्थ विशेषता महिला या स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत होते. गावातून प्रभू रामांची मूर्ती ही वाजत गाजत नेण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच सरबत याची स्टाॅल लावुन व्यवस्था करण्यात आली हाेती. बस स्थानक परिसरात मोठ्या स्क्रीनवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा लाइव्ह दाखवण्यात आला. ग्रामस्थांनी एकत्र बसून हा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहिला. यावेळी ग्रामस्थांकडून फळ वाटप करण्यात आले. या सोहळ्यात गावातील मुस्लिम धर्माचे तरुण यांनी सहभाग घेतला.त्यामुळे गावात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन झाले. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गावातील काही ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था ही करण्यात आली हाेती.
चौकट-कजगाव येथील हॉटेल व्यावसायिक प्रकाश सोनार यांनी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने गावातील सर्व भाविकांना व प्रवाशांना हॉटेलवर सकाळपासून पूर्ण दिवसभर चहा मोफत वाटप करण्यात आली.
