Home » वाणिज्य » भारतातील पहिल्या सीएनजी बाइकबाबत मोठे अपडेट, बजाज यांनी सांगितले कधी लॉन्च होणार

भारतातील पहिल्या सीएनजी बाइकबाबत मोठे अपडेट, बजाज यांनी सांगितले कधी लॉन्च होणार

नवी दिल्ली | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सीएनजी कार्सनंतर आता लवकरच सीएनजी बाईकही भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. ग्राहकवर्ग ई बाईक जरी कडे वळाला असला तरी आता सीएनजी वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या मालिकेत भारत सरकारसह अनेक मोठ्या कंपन्या ह्या सीएनजी वाहनांच्या उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. बजाज ऑटोने उत्पादित केलेली भारतातील पहिली सीएनजी पॉवर बाईक जूनमध्ये बाजारात येईल, असे बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी सांगितले. नवीन बाईक, १००-१२५cc सेगमेंटमध्ये असण्याची शक्यता आहे

चालू वर्षी जून महिन्यात बजाज ऑटो देशातील पहिली CNG क्लीन फ्युएल बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने सीएसआरमध्ये पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बजाज ऑटो व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ इंधन मोटारसायकलींची विशेष मालिका सादर करण्यास तयार आहे. या नियोजना अंतर्गत सीएनजी बाईकचे पहिले मॉडेल जून २०२४ मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. यासोबतच कंपनीने पुढील पाच वर्षांत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ५’००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आगामी नवीन मोटरसायकल कॉम्प्रेस्ड नॅचरल (सीएनजी) वर लॉन्च करणार आहे.

पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या ग्राहकांना ही बाईक उत्तम इंधन कार्यक्षमता प्रदान करेल. ही नवीन बाईक उच्च मायलेजची मागणी असलेल्या ग्राहकांना आकर्षित करेल. सीएनजी तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या या बाइकमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या बाइकमध्ये एक खास टँक बसवण्यात आली आहे, ज्यात पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही पर्याय असतील. बाईकची किंमत मात्र पेट्रोल बाईकपेक्षा जास्त असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!