Headlines
Home » क्राईम » साई नगरी शिर्डीत भरदुपारी गोळीबार ; वाढती गुन्हेगारी भक्तांसाठी चिंतेची बाब

साई नगरी शिर्डीत भरदुपारी गोळीबार ; वाढती गुन्हेगारी भक्तांसाठी चिंतेची बाब

शिर्डी | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– साईबाबांची नगरी शिर्डी मध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे शिर्डीतील नागरिकरांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. साईबाबा मंदिर आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या जवळच झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की २१ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी साईनाथ रवींद्र पवार आणि त्याचा भाऊ सचिन पवार बसले होते. तेवढ्यात तेथे संपत शंकर वायकरसह त्याचा अनोळखी साथीदार असे दोघे जण मोटारसायकलने आले. दोघे साईनाथच्या दिशेने येऊन संपत वायकर याने गावठी कट्टा काढून साईनाथला म्हणाला की, तुला एकदाच संपवून टाकतो. असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने साईनाथच्या डोक्याच्या दिशेने गावठी कट्टाने फायर केला. मात्र फिर्यादीने तो चुकवला. त्यानंतर त्याने पुन्हा आमच्या दिशेने फायर केला, परंतु तो फायर झाला नाही. फिर्यादीच्या सांगण्यावरुन शिर्डी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

दरम्यान साईबाबांच्या पवित्र नगरीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंदे सुरू आहे. अनेक हॉटेल्स मध्ये नको ते कृत्य घडत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी साई मंदिर परिसरात चहा विक्रेत्यावर काही टवाळखोरांनी चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर अशा अनेक छोटे-मोठे प्रकार घडले आहे. आता तर चक्क पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शिर्डीत कायदा सुव्यवस्था राहिली की नाही? पोलीस प्रशासन करत काय? असाही प्रश्न सामान्य साई भक्तांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

मागिल दीड महिन्यात शिर्डीत सतत गॅंगवॉर सुरू असून साई मंदिराच्या लगत परिसरामध्ये वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब ठरत आहे. शिर्डीचे नागरिकांसह येणारा साई भक्त येथे सुरक्षित नाही. पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर ठोस कारवाई होत नसून पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!