Home » सामाजिक » बनावट दस्तावेजा आधारे कामं देणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करा; उपोषणकर्त्याची मागणी

बनावट दस्तावेजा आधारे कामं देणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करा; उपोषणकर्त्याची मागणी

जळगाव | दि.२१(वास्तव पोस्ट न्युज) – जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील मृद व जलसंधारण विभाग जिल्हा जलसंधारण अधिकारी जळगाव, यांच्या कार्यालयात बनावट दस्तऐवज सादर करून मिळवलेल्या कामांची चौकशी व्हावी याकरीता माहिती अधिकार कार्यकर्त्याने आजपासून उपोषण सुरू केले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग जळगाव व वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी यांनी मे.व्ही.टी. परदेशी ॲण्ड सन्स नांदगाव या कंत्राटदारासोबत संगनमत करून केलेल्या गैरकारभाराची चौकशी व्हावी या मागणीकरीता उपोषणकर्ते नरेंद्र भागवत सपकाळे जिल्हा संघटक, माहिती अधिकार महासंघ, जळगाव यांनी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे. त्यात
१) बनावट दस्तऐवज सादर करून अधिकारी व कर्मचारी यांच्या संगमताने कोटी रुपयांचे कामे अनधिकृत पणे मिळवून देण्याकरीता सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी.
२) संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विभागीय व उच्चस्तरीय चौकशी करावी.
३) संपूर्ण प्रकरणाची उच्च तांत्रिक समिती मार्फत चौकशी करावी.
४) बनावट दस्तऐवज ( वर्क डन) सादर करून कोटी रुपयांचे कामे अनधिकृतपणे मिळवणारे कंत्राटदार मे. व्हि. टी. परदेशी अँण्ड सन्स नांदगाव, यांना काळया यादीत टाकून त्यांचा परवाना रद्द करावा.

अशा मागण्या उपोषणकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नरेंद्र भागवत सपकाळे यांनी केल्या असून संबंधित अधिकारी व वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

One thought on “बनावट दस्तावेजा आधारे कामं देणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करा; उपोषणकर्त्याची मागणी

  1. सदर जिल्हा जलसंधरण अधिकारी यांच्या कडे श्री सपकाळे हे उपोषणाला बसल्या नंतर कसे एफ डी आर आलेत? माहिती चे अवलोकन केले त्यावेळेस का? एफ डी आर दाखवले नाही.आवका रजिस्टर ला त्याची नोंद नाही आणि आत्ता कसे? कुठून आलेत? एफ डी आर हा प्रश्न आहे? वर्क ओडर कोण्ही तयार केल्या? हा देखील प्रश्न आहे? एफ डी आर जमा करणे बाबत काही पत्र व्यवहार आहेत का? जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांन कडे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!