Headlines
Home » क्राईम » बनावट मद्यनिर्मिती कारखान्याच्या धाडीत २७ लाखांचा मुद्देमाल जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

बनावट मद्यनिर्मिती कारखान्याच्या धाडीत २७ लाखांचा मुद्देमाल जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

ठाणे | दि१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मालाड आणि मीरारोड येथील विदेशी नकली स्कॉच आणि महागडे मद्य बनवणाऱ्या एका कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकून एकूण २७ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असुन नरशी परबत बामनिया, भरत गणेश पटेल, दिलीप हरसुखलाल देसाई, विजय शंकर यादव, अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी पुढील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाला ठाणे आणि मुंबई या ठिकाणी अवैध मद्य तयार करण्याचे काम सुरू असल्याची खबर प्राप्त झाली. त्यानंतर प्राप्त माहितीच्या आधारे सापळा लाऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं जुहू तारा रोड, मालाड येथे एका रिक्षातून वाहतूक केली जाणारे विदेशी स्कॉच जप्त केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चौकशीत हे मद्य बनावट असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकास ताब्यात घेऊन, त्याची कसून चौकशी केली असता हे मद्य मिरा रोड येथे एका कारखान्यात बनत असल्याची माहिती त्याच्याकडून मिळाली.

राज्य उत्पादन शुल्काच्या पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे शांती पार्क मीरा रोड येथील एका कारखान्यावर धाड टाकली, तेव्हा सदर कारखान्यात विदेशी कंपन्यांचे बनावट मद्य निर्मिती होत असल्याचं आढळून आले. या कारखान्यामध्ये हे विदेशी बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे पॅकिंग साहित्य आणि रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. ऐन निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कामगिरीमुळे या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!