Headlines
Home » सामाजिक » जळगाव रेल्वे डाक सेवा कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा

जळगाव रेल्वे डाक सेवा कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्युज ) – जळगाव रेल्वे स्टेशनच्या डाक सेवा एल डिव्हिजनच्या एस आर ओ कार्यालयात आज १० वाजता जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भारती कुमावत, जळगाव रेल्वे स्टेशनचे आर पी एफ तडवी, तसेच पूजा पटेल यांची लाभली.

या प्रसंगी ॲड भारती कुमावत यांनी महिला दिनानिमित्त मौलिक विचार मांडले स्री- सक्षमिकरणासाठी तसेच आधुनिक भारताच्या जडणघडणीत नारिशक्ती चें योगदान तसेच महिलानी पुढे येऊन खऱ्या अर्थाने सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याच्या ठसा उमटावा असा आशावाद व्यक्त केला.

ह्या कार्यक्रमास कार्यालयातर्फे महिला दिनानिमित्त मार्गदर्शन एस आर ओ एस डी कोल्हेकर व कॅशियर /चेकर दिपक डी पाटील यांनी केले. याप्रसंगी कार्यालयीन महिला कर्मचारी प्रियंका पाटील, रोशणी कोळी यांचा देखील सन्मान करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी आभार बी व्ही भावसार यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!