कजगाव, दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | कजगाव येथे आज संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत रोहिदास महाराज यांनी समाजाला दिलेली शिकवण व त्यांनी केलेले उपदेश प्रत्येकाने आचरणात आणावे, असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. “मन चंगा तो कटोती मे गंगा “असे म्हनणारे रोहिदास महाराज अशा संतांचे उपदेश जीवन प्रकाशित करतात असा संदेश या जयंतीनिमित्त देण्यात आला.

या जयंती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार संघटनाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे (नाना मिस्तरी) उपसरपंच समाधान पवार, माजी उपसरपंच शफी मणियार, वसंत शिनकर, अध्यक्ष रवी अहिरे ,युवा तालुका अध्यक्ष सुधीर अहिरे ,तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान पाटील, माजी सैनिक आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष समाधान पाटील ,यशवंत मोरे ,अनिल महाजन, ग्रामपंचायत सदस्य मांगीलाल मोरे ,वाल्मीक मोरे प्र,स्ताविक व आभार भद्रे सर यांनी केले. जयंती कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात चर्मकार समाज हा गावात अल्प असला तरी समाजात एकी ही टिकून आहे. आपण त्या समाजाला न्याय देण्याचे काम नेहमीच केले आहे. समाजाच्या सभा मंडपसाठी पंधरा लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे असे सांगितले .
